कोलकाता : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचं निधन झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. कोलकाताच्या बिर्ला रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


मृत्यूसमयी त्या 88 वर्षांच्या होत्या. उत्तर प्रदेशातल्या बनारसमध्ये 8 मे 1929 ला त्यांचा जन्म झाला होता.


बनारस घराण्याच्या त्या गायिका होत्या. आपल्या ठुमरी गायनासाठी त्या विशेष प्रसिद्ध होत्या. 


गिरिजा देवी यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं.