Satyashodhak Marathi movie : सध्या अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshree Deshpande) आणि अभिनेते संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) यांचा सत्यशोधक सिनेमा (Satyashodhak) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यातील सामाजिक सुधारणा घडवणारे अग्रदूत म्हणून ओळखल्या जाणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रीयांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकतृत्वाला उजाळा देणारा ‘सत्यशोधक’ चित्रपट अनेकांना भावला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सत्यशोधक सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू आणि सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची (Satyashodhak Tax Free) घोषणा केल्याने आता आनंद व्यक्त केला जातोय. या सिनेमामध्ये संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली असून राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. अशातच आता तिकीट कमी झाल्याने सिनेमाला प्रेक्षक कशी दाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय 


राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.


ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी


शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी


जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी


पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत वाढ.


महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार


श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी


राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी