Dharamveer 2 CM Eknath Shinde : आज 27 सप्टेंबर रोजी 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा जेव्हा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांमधली उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती. दरम्यान, पहिल्या भागात जिथे चित्रपटाच्या क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांसमोर प्रश्न उपस्थित झाला होता तिथे दुसरीकडे आता काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता एक लक्षवेधी गोष्ट समोर आली आहे की या चित्रपटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात स्वत: एक भूमिका साकारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका ही अभिनेता क्षितीश दाते यानं साकारली आहे. पण चित्रपटाच्या शेवटी काही मिनिटांसाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसत आहेत. तर त्यांच्या चित्रपटातील डायलॉग्सवर प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या पडल्या आहेत. नेहमी आपण पाहतो की कलाकार हे त्या त्या राजकारण्याची भूमिका साकारताना दिसतात. कधीच राजकारणात सक्रिय असलेली व्यक्ती ही चित्रपटात किंवा मोठ्या पडद्यावर दिसत नाही. पण यावेळी चक्क मुख्यमंत्रीच पडद्यावर आले. त्यामुळे आता या सगळ्याचा येत्या निवडणूकीवर काही परिणाम होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 



सोशल मीडियावर नेटकरी त्यांना असलेली उत्सुकता ही दाखवत आहेत. आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत 'धर्मवीर 2' पाहण्यासाठी असलेली त्यांची उस्तुकता दाखवली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'जीवनापेक्षा मोठी कथा आणि एक आशादायक सिक्वेल!  धर्मवीर 2 आज रिलीज होत आहे, आणि मी जादू पाहण्यासाठी थांबू शकत नाही.' 


हेही वाचा : 'धर्मापासून लांब राहणं योग्य...', 'आदिपुरुष' वादावर सैफनं सोडलं मौन; असं काय बोलला अभिनेता?


दरम्यान, 'धर्मवीर 2' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका ही अभिनेता प्रसाद ओकनं साकारली आहे. तर हा चित्रपट झी स्टुडियोज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत आहे.