'धर्मापासून लांब राहणं योग्य...', 'आदिपुरुष' वादावर सैफनं सोडलं मौन; असं काय बोलला अभिनेता?

Saif Ali Khan :  ,सैफ अली खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'आदिपुरुष' च्या वादावर केलं वक्तव्य

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2024, 10:54 AM IST
'धर्मापासून लांब राहणं योग्य...', 'आदिपुरुष' वादावर सैफनं सोडलं मौन; असं काय बोलला अभिनेता? title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं 'आदिपुरुष' चित्रपटात रावणाची भूमिका साकारली होती. त्यावरून खूप मोठा वाद झाला होता. अनेकांनी त्याला खिलजीची भूमिका असल्याचे म्हटले. सैफवर हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्याचे देखील म्हटले होते. इतकंच नाही तर त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशच्या जौनपुरमध्ये तक्रार दाखल केली. या वादानं तेव्हा भयानक रुप घेतले जेव्हा सैफनं एक वक्तव्य केलं होतं आणि त्यात म्हटलं होत की रावणाच्या भूमिकेला मानवीय रुप दाखवलं आहे. त्यानंतर सैफनं त्याचं हे शब्द मागे घेतले होते. या घटनेवर सैफनं त्याचं मत मांडलं आहे. त्यानं म्हटलं की धर्मापासून लांब राहणं योग्य. 

'आदिपुरुष'वर वक्तव्य

सध्या सैफ अली खान हा 'देवरा: पार्ट 1' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानिमित्तानं सैफ अली खाननं 'इंडियाटुडे' ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं 'आदिपुरुष' शिवाय कुटुंब, धर्म आणि राजकारण सारख्या मुद्यांवर वक्तव्य केलं की 'आदिपुरुष'चा वाद हा खूप त्रासदायक होता. सैफनं म्हटलं की 'त्याला माहित नाही की हे प्रकरण इतकं वाढेल आणि त्याला चित्रपट आणि निर्मातांना इतक्या ट्रोलिंगचा सामना करावा लागेल. ते म्हणाले, कोर्टानं एका प्रकारे हा निर्णय घेतला होता आणि त्यात सांगितलं होतं की कलाकार स्क्रीनवर जे काही बोलतो, त्यासाठी तो जबाबदार असतो.' 

धर्मासारख्या मुद्द्यांपासून लांब राहणं योग्य

सैफ पुढे म्हणाला की 'मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेकांना त्यांना काय वाटतं हे सांगण्यासाठी किंवा त्यांना काय करायचं आहे हे ते करण्यासाठी स्वातंत्र्य नसतं. आम्हाला सगळ्यांना स्वत: वर थोडं लक्ष ठेवायला हवं आणि थोडं सावधान राहायला हवं. नाही तर काही समस्या उद्भवू शकतात. धर्मासारखे काही मुद्दे आहेत ज्यापासून तुम्हाला लांब राहण्याची गरज आहे. आम्ही इथे कोणत्याही प्रकारची समस्या उपस्थित करण्यासाठी नाही आहोत.'

याशिवाय सैफनं तांडव या सीरिजविषयी देखील वक्तव्य केलं. या सीरिजमध्ये त्यानं एका राजकारण्याची भूमिका साकारली होती. त्यावरून देखील खूप वाद झाला होता. सैफनं म्हटलं होतं की 'आपण आपल्या कामातून शिकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आणि वादांपासून दूर राहायला हवं.'