CM Eknath Shinde Shivrayancha Chhava Movie : आपण अनेकदा आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत असतो. सोशल मीडियावर त्याविषयी पोस्ट देखील शेअर करतो. आपल्या प्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देखील एका चित्रपटाची प्रतिक्षा आहे. हा मराठी चित्रपट असून त्याचं नाव ‘शिवरायांचा छावा’ आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून तोंडभरून कौतुक केले असून या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट शिवराज अष्टकामधून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या समोर मांडणारे लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आहे. या चित्रपटात ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे आयुष्य दाखवणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपाटातून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील न उलगडलेली पानं प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर त्यांनी शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत ते म्हणाले की 'धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट शिवरायांचा छावा येत्या 16 फेब्रूवारी 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा.'



दिग्पाल यांनी कशी केली चित्रपटाची घोषणा?


दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा केली. तसेच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे.


हेही वाचा : ...म्हणून ललित प्रभाकर 'आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला


श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी आहे. 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकणार आहेत.याशिवाय विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख असे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.