Dharmaveer : `दिघे यांचा मृत्यूनं शिवसैनिकांवर आघात...`, म्हणून मुख्यमंत्र्यांनी पाहिले नाही शेवटचे क्षण
Dharmaveer : `दिघे यांच्या मृत्यूनंतर मी बाळासाहेबांना...`, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावुक
मुंबई : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'धर्मवीर' सीनेमाची चर्चा आहे. सिनेमा पाहाण्यासाठी अनेक जण सिनेमागृहात गर्दी करत आहेत. तर आनंद दिघे यांची जीवनपट पाहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्नीसह हजेरी लावली.
पण उद्धव ठाकरे यांनी सिनेमाचा शेवट पाहिला नाही. सिनेमा संपायला 10 मिनिटं बाकी होते, तेव्हा मुख्यमंत्री सिनेमागृहाबाहेर आले. सिनेमातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं.
सिनेमात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर दिघे यांना जखमी अवस्थेत रुग्णालायात दाखल करण्यात आलं.
आनंद दिघे रुग्णालयात उपचार घेत असताना, त्यांची सिंघानिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे आणि नारायण राणे आल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती मिळताचं धावत आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे.. हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारं आहे...
सिनेमागृहातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी सिनेमाचा शेवट पाहू शकलो नाही... आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत. दिघे यांचा मृत्यू म्हणजे शिवसैनिकांवर आघात...'