मुंबई: बॉलिवूडमध्ये क्यूट कपलच्या यादीत सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आहेत. सध्या रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या नात्याच्या चर्चा फार रंगत आहेत. हे प्रेमी युगुल लवकरच साखरपुडा करणार आहेत. रणबीरला डेट करण्याआधी आलियाचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत जोडले गेले होते. 'स्‍टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमाच्या माध्यमातून सिद्धार्थ-आलिया यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. पण काही काळा नंतर या दोघांच्या नात्याला तडा गेला आणि ते विभक्त झाले. सिद्धार्थ आणि आलिया यांच्या ब्रेकअपचे मुख्य कारण जॅकलीन असल्याचे समोर आले होते. रविवारी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सिद्धार्थ उपस्थित होता. यावेळी सिद्धार्थने आपल्या नात्याचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थने शोमध्ये त्याच्यात आणि जॅकलीनमध्ये घट्ट मैत्री असल्याचा खुलासा त्याने केला. 'अ जेंटलमेन' सिनेमादरम्यान त्याच्यात घट्ट मैत्री झाल्याचे त्याने सांगितले. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार 'माझ्यात आणि जॅकलीनमध्ये मैत्री पलीकडे कोणतेही नाते नव्हते, आम्ही कधी एकमेकांना डेट केले नाही.'



त्यानंतर या प्रश्नांच्या शोमध्ये करणने सिद्धार्थला कियारा आडवानी सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थने सांगितले 'मी आणि कियारा लवकरच एक सिनेमा करणार आहे आणि सध्या तरी मी सिंगल आहे.'


सिद्धार्थ सध्या त्याच्या बहुप्रतिक्षीत सिनेमा 'मरजावां'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात सिद्धार्थ व्यतिरिक्त रकुलप्रीत सिंग, तारा सुतारिया, रितेश देशमुख  झळकणार आहे.