मुंबई : कॉमेडिअन सिद्धार्थ सागर चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती काही दिवासांपूर्वी समोर आली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन आपण एक भयंकर प्रसंगातून गेल्याची माहिती त्याने दिली. त्याचबरोबर लवकरच माझ्या फॅन्सना यामागची कारण सांगेन असेही तो म्हणाला. आता मात्र त्याची सर्व कहाणी समोर आली आहे. सिद्धार्थनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.


त्याने सांगितले की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या वर्षभरापासून प्रचंड त्रासातून जात आहे. मला माहित आहे की, माझ्या अचानक गायब होण्याने खूप त्रास झाला असेल. लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सविस्तर माहिती देईन. आता फक्त इतकंच सांगतो की, मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या कुटुंबात गेल्या काही काळापासून प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहेत. मी आता सुरक्षित आहे आणि या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.


त्याचबरोबर पुढे तो म्हणाला की, मी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. पण कोणीच मला मदत केली नाही. तसंच त्याने एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला. त्याने सांगितले की, एक अनोळखी मुलगी मला टॅबलेट्स देत होती. त्यामुळे मी नशेत राहायचो. मी माझ्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती.



सिद्धार्थबद्दल...


सिद्धार्थ टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन असून त्याने कॉमेडी सर्कस, छोटे मिया बडे मिया, लाफ्टर के फटके आणि कॉमेडी सर्कस के अजूबे यांसारख्या कॉमेडी शो मध्ये काम केले होते.