मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास कॉमेडीपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहतो. आता पुन्हा एकदा भारतातील महिलांच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. वीर दासच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे, इतकेच नाही तर त्याच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोपही केला जात आहे. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण?
वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अलीकडेच त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर 'आय कम फ्रॉम टू इंडिया' नावाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ जॉन एफ. केनेडी सेंटर, वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सपैकी एक आहे. सहा मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये वीर दास देशातील लोकांच्या दुहेरी चारित्र्याबद्दल बोलत आहेत. 


ज्यामध्ये त्याने कोविड-19 महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी प्रदर्शन यासारखे मुद्दे आपल्या कॉमेडीचा भाग बनवले. मात्र हे व्हिडीओ समोर येताच देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आता सोशल मीडियावर वीरला ट्रोल केले जात आहे.



काय आहे त्या व्हिडीओमध्ये 
या व्हिडीओ क्लिपमध्ये वीर दास म्हणतो, 'मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार केला जातो.मी भारतातून आलो आहे जिथे लोक शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतात पण त्याच शेतकऱ्यांना त्रास देतात....'



खुद्द वीर दासने दिलं स्पष्टीकरण
सध्या  रंगलेल्या वादावर वीर दासने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. 'देशाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे, परंतू सर्व प्रकरणांनंतरही देश महान आहे याची आठवण करून देण्याचा त्यांचा हेतू आहे. व्हिडीओमध्ये एकाच विषयावर दोन भिन्न मते असलेल्या लोकांबद्दल बोलले जात आहे  आणि हे रहस्य नाही जे लोकांना माहित नाही...' असं स्पष्टीकरण वीर दासने दिलं आहे.