Bharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, `तो` जोक पडला महागात
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे.
मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे.
भारतीने एका कॉमेडी शोमध्ये दाढी-मिशीवर विनोद केला होता. ज्यावर शीख समुदायाच्या नागरीकांनी आक्षेप घेत तिला विरोध दर्शवला होता. आता या प्रकरणाला घेऊन अमृतसर शीख संघटनांकडून भारती सिंह विरोधात निदर्शने केली आहेत. तसेच दाढी आणि मिशांबाबत भारती सिंगच्या वक्तव्यावर SGPC कॉमेडियनविरोधात एफआयआर नोंदवणार आहे.
एसजीपीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारती सिंह यांच्या वक्तव्यावर शीख समुदायाचे लोक प्रचंड संतापले आहेत. अशा स्थितीत SGPC कॉमेडियन भारती सिंग यांच्याविरोधात शीखांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे.
प्रकरण काय ?
टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन भारतीच्या एका कॉमेडी शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी भारतीने दाढी-मिशी का नको. दूध प्यायल्यावर दाढी तोंडात घातली तर शेवया टेस्ट येतात. माझे अनेक मित्र ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ते दिवसभर दाढी-मिशीतील उवा काढण्यात घालवतात. अशा आशयाचा जोक भारतीने मारला होता.
भारतीने मागितली माफी
भारती सिंहने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. या व्हिडिओत ती म्हणतेय, मी कधीही कोणत्याही धर्माबद्दल किंवा कोणत्याही जातीबद्दल बोलले नाही की, या धर्माचे लोक दाढी ठेवतात आणि ही समस्या उद्भवते. पंजाबींना दाढी ठेवली की त्रास होतो असे म्हटले जात नाही. मी सर्वसाधारणपणे बोलत होते. माझ्या बोलण्याने कोणत्याही धर्माचे लोक दुखावले गेले असतील तर मी हात जोडून माफी मागते.
मी स्वतः पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसर येथे झाला. मी पंजाबचा अभिमान कायम ठेवीन आणि मला अभिमान आहे की मी पंजाबी आहे, असेही तिने म्हटलेय. भारती पुढे म्हणते, मी लोकांना आनंद देण्यासाठी कॉमेडी करते, कुणाला दुखावण्यासाठी नाही. माझ्या काही गोष्टी दुखावल्या असतील तर मला तुमची बहीण समजून माफ करा.
भारती सिंगला हा जोक चांगलाच महागात पडलाय. भारतीने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, मात्र तरीही हा वाद थांबण्याचे नाव घेत नसून वाढतच चालला आहे.