Bharti Singh: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकतीच आई बनलेली भारती सिंग तिचा मुलगा लक्ष्य (गोलू)सोबत कॅमेऱ्यासमोर आली. तिचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यात भारती मस्करी करत पापाराझींना धमकावताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमेडियन भारती सिंग पापाराझींना (Papparazzi) बोट दाखवून म्हणते की माझा गोलू तुम्हा सर्वांचा बदला घेईल. भारती असं गंमती म्हणाली असली तरी तिच्या मुलासह आणि पतीसह ती एकेठिकाणी स्पॉट झालेली असताना पापाराझी तिच्या हात धुवून मागेच लागले. 


व्हिडीओमध्ये भारती तिचा मुलगा आणि मुलाच्या नॅनीसोबत कारमध्ये बसलेली दिसते आहे. हर्ष लिंबाचिया (Harsh Limachhiyya) गाडीच्या पुढच्या सीटवर बसला आहे. तेव्हा पापाराझींनी त्यालाही त्याच्या फोटोत कॅप्चर केले. 


शुक्रवारी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. गोलूला आपल्या कडेवर घेऊन उभ्या असलेल्या भारतीला पापाराझींनी घेरले. तेव्हा भारतीला गंमतीत गोलूला म्हणाली, 'गोलू, मी गरोदर होते तेव्हा हे पापाराझी बाईकवरून माझ्यामागे लागले होते पण आता तू त्यांचा बदला घे...'', हे म्हणताना भारती पापाराझीला म्हणते, ''माझा मुलगा बाईक घेऊन तुमच्यापाठी येईल आणि तुमचा बदला घेईल''


यादरम्यान पापाराझींनी हर्षचे आणि भारतीचे आई-वडील झाल्याबद्दल अभिनंदन केले. पापाराझींना हर्षनं आपल्या मुलाची ओळखही करून दिली. आपल्या मुलाला मांडीवर घेऊन कारमधून बाहेर आल्यानंतर भारतीने पापाराझींचे आभारही मानले. 'ये सारे तेरे मामा है बेटा' असे त्यांनी आपल्या मुलाला फोटोग्राफर्सबद्दल सांगितले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यावर्षीच्या 3 एप्रिलला हर्ष आणि भारतीला मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी लक्ष्य (Lakshya) असे ठेवले आहे. परंतु भारती त्याला प्रेमाने गोलू म्हणते. गोलूच्या गोंडसपणाने सगळ्यांची मने जिंकली आहेत.