गोविंदाच्या सुनेचा बेडरुममधील बोल्ड फोटो व्हायरल; पतीनं पाहताच...
तर काय होणार?
मुंबई : सेलिब्रिटी कुटुंबाबाबत सांगायचं तर, एका व्यक्तीमुळं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात येतं. सदस्यांनाही माध्यमांकडून चांगलीच पसंती आणि प्रसिद्धीही मिळते. एकाच कुटुंबात मग एकाहून अधिक सेलिब्रिटी असतील तर काय होणार?
तर, तर चर्चांना आणखी वाव मिळणार. विषयांना आणखी फाटेही फुटणार.
सध्या असंच घडतंय सुपरस्टार गोविंदा यांच्या सुनेसोबत.
त्यांची ही सून सध्या तिच्या बोल्ड लूकमुळं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
थेट बेडरुममधील बोल्ड फोटोच शेअर करत तिनं आपल्या मादक सौंदर्याची झलक सर्वांपर्यंत आणली आहे.
तिचं नाव आहे अभिनेत्री कश्मीरा शाह. कश्मीरा ही अभिनेता आणि विनोदवीर कृष्णा अभिषेक याची पत्नी.
गोविंदा यांच्याशी त्यांचं काय नातं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर, त्याचं उत्तर असं आहे की; कृष्णा हा गोविंदा यांचा भाचा आहे. ज्यामुळं कश्मीरा ही त्यांची सून.
कश्मीराच्या या बोल्ड फोटोबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. जिथं तिनं या फोटोशूटसाठी लाल रंगाच्या बिकीनीला पसंती दिली आहे.
निळ्या रंगाचं बटणं खुली असणारं शर्ट त्यात कश्मीराचा बिकीनी लूक आणि मोकळे केस हे सारं समीकरण अगदी योग्य पद्धतीनं जमून आल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे.
सोशल मीडियावर तिच्या या फोटोची बरीच चर्चा होत आहे.
असं असतानाच तिचा पती, कृष्णा यालाही पत्नीचा हा लूक आवडला असणार यात शंका नाही.
कश्मीरा कायमच सोशल मीडियावरुन काही बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यातच आता तिच्या या नव्या फोटोची भर पडली आहे.