Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनचं निधन, 32 वा वाढदिवस साजरा करताच चटका लावणारी एक्झिट!
Neel Nanda Dies : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधन झाले आहे.
Neel Nanda Passes away : मनोरंजन विश्वासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाचा स्टँड-अप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधन (Comedian Neel Nanda Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अवघ्या 32व्या वर्षी कॉमेडियन नील नंदा याचं निधन (Neel Nanda Dies) झाल्याने चटका लावणारी एक्झिट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. वाढदिवसानंतर काहीच दिवसात नील नंदाचं निधन झाल्याने खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
नील नंदा हा जिमी किमेल लाईव्हसाठी, त्याचबरोबर कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीसाठी प्रसिद्ध होता. अनेक फॅन्स त्याचा खास शो पाहण्यासाठी उपस्थित असायचे. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त होती. मात्र, आता फॅन्सला त्याच्या निधनाच्या बातमीमुळे धक्का बसला आहे. नीलच्या मृत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या कुटूंबियांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.
नीलचा मॅनेजर ग्रेग वेइस याने एका निवेदनात याची माहिती दिली. 24 डिसेंबरला दिलेल्या निवेदनात ग्रेग वेइस याने दु:ख व्यक्त केलं. बातमी ऐकताच मला खूप मोठा धक्का बसला आहे. विनोदी अभिनेता होताच याशिवाय एक महान माणूस होता. जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत त्याचे शो होते. पण तो आता या जगात नाही आहे, असं म्हणत ग्रेग वेइस याने भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, नंदा यांच्या मृत्यूची तारीख आणि कारण त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मैत्रिणीच्या विनंतीवरून उघड करण्यात आली नाही. नील हा मूळचा भारतीय होता जो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. त्यांना लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांनी हाच व्यवसाय केला.