मुंबई : हंगामा, चुपके चुपके, मालामाल विकली यांसारख्या सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेला कॉमेडियन अभिनेता राजपाल यादव याच्यावर लोन न फेडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजपाल यादवसह त्याची पत्ना आणि कंपनीला दोषी ठरवल्यात आले आहे. दिल्लीच्या कडकडूमा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. राजपालवर ५ कोटींचे कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपोट्सनुसार, लक्ष्मीनगर येथील मुरली प्रॉजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने राजपालविरोधात चेक बाऊंन्सबरोबरच सात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत.


यासाठी घेतले होते कर्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अता पता लापता या सिनेमासाठी राजपालने दिल्लीच्या एका बिजनेसमॅनकडून ५ कोटी रुपये घेतले होते. हा सिनेमा प्रदर्शित झाला मात्र चालला नाही. त्यामुळेच राजपाल यादव सिनेमासाठी घेतलेले पैसे व्यापाऱ्याला परत देऊ शकले नाहीत. या प्रकरणावरुन या व्यापाऱ्याने राजपाल यादव त्याची पत्नी आणि कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



या दिवशी असेल पुढील सुनावणी


हाती आलेल्या माहितीनुसार, राजपालला नोटीस पाठवण्यात आली तरी तो कोर्टात हजर झाला नाही. २०१३ मध्ये राजपाल यादवला १० दिवसांसाठी न्यायालयीन ताब्यात घेण्यात आले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिलला आहे.