मुंबई : केवळ एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू करण्यात आलेल्या 'चला हवा येऊ द्या' या विशेष कार्यक्रमाची आता सुपरहीट मालिकेत रूपांतर झालं आहे. थुकरटवाडीच्या विनोदीवीरांना जगभरातून लोकप्रियता मिळाली आहे. आता हा कार्यक्रमाचा पुढील नवा टप्पा रसिकांच्या भेटीला येणार आहे.  


चला हवा.. चा नवा टप्पा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्ष अविरत प्रेक्षकांना हसवणारा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा  चला हवा येऊ द्या आता नव्या स्वरूपात येणार आहे. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यशस्वी झाल्यानंतर आता थुकरटवाडीचे विनोदवीर आपल्या समोर नवीन पर्वात येणार आहे. 


सामान्य विनोदवीरांना मिळणार संधी 


आता तुमच्यातील विनोदीवीराला झी मराठी संधी देणार आहे. त्यासाठी आपल्या सादरीकरणाचा २ मिनिटांचा विडिओ करून पाठवायचा आहे. सर्वोत्कृष्ट विनोदवीराला चला हवा येऊ द्या च्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना हसवण्याची संधी मिळणार आहे. हे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे तुमच्या अंगी असेल विनोदाचा किडा, तर मग उचला थुकरटवाडीचा विडा..