मुंबई : आज अभिनेत्री नीलमचा 50 वा वाढदिवस वाढदिवस. नीलमने 80 ते 90 च्या दशकात गोविंदासोबत सिनेमात काम केलं आहे. नीलम एक अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत गोविंदा लग्न देखील करायला तयार होता. नीलम गोविंदाच्या 1986 च्या पहिल्या सिनेमात इल्जाममध्ये होती. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप पसंत केली. यानंतर दोघांनी अनेक सिनेमात काम केलं. खुदगर्ज पाठोपाठ 'मैं से मीना से न साखी से' हे अतिशय लोकप्रिय झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदाने एका मुलाखतीत सांगितलं की, मी पहिल्यांदा नीलमला प्राणलाल मेहताच्या ऑफिसमध्ये पाहिलं. नीलमने तेव्हा सफेद रंगाची शॉर्ट्स घातली होती. तिचे लांब मोकळे केस बघून असं वाटलं की, ती एक परीच आहे. गोविंदा सेटवर नीलमला जोक ऐकवून खूप हसत होतो. यानंतर गोविंदा नीलमला खूप पसंत करत असे. 


गोविंदा नीलमच्या बाबतीत खूप सिरियस होता. नीलमचं कुणा दुसऱ्या हिरोसोबत काम करणं देखील गोविंदाला पसंत नसे. आणि याच काळात गोविंदाच्या आयुष्यात सुनीताची एन्ट्री झाली. पण तो नीलमला विसरू शकला नाही. 


सुनीताने या दरम्यान नीलमबद्दल असं काही वक्तव्य केलं की, गोविंदा आपला साखरपुडा  देखील तोडला. गोविंदाने आईसमोर नीलमसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. गोविंदाची आई मात्र त्याने सुनीताशी लग्न करावं अशी इच्छा धरून होती. आणि गोविंदाने आईची इच्छा पूर्ण केली.