`कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये, करतोय आत्महत्येचा विचार`
शुक्रवारपासुन कपिल शर्मा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय.
मुंबई : शुक्रवारपासुन कपिल शर्मा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. धक्कादायक ट्विट केल्यानंतर आता कपिल शर्माने आपली एक्स मॅनेजर आणि एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोस आणि तिची बहिण निती यांच्यावर २५-२५ लाख रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केलाय. तर 'स्पॉटबॉय'चा एडिटर विक्की लालवानीने २५ लाखाची मागणी केली आणि ती पूर्ण न केल्याने डिजिटल मीडियावर त्याची प्रतिमा बिघडविण्याचा आरोप केलाय. कपिल आणि माझ्यामध्ये ८ वर्षांच रिलेशन होतं, जे गेल्यावर्षी काही वैयक्तिक कारणामुळे तुटलं. त्यानंतर कपिलच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात अडचणी सुरू झाल्याचे कपिलच्या एक्सने ibt times मध्ये एका मुलाखतीत सांगितले.
कपिल तणावात - प्रिती
माझ्या आणि कपिलमध्ये आम्ही कधीकधीच बोलायचो. दरम्यान कपिलने आपल्यावर होणाऱ्या तणावाची कबुली दिली होती. आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचेही कपिलने सांगितल्याचे प्रितीने या मुलाखतीत सांगितले.
कपिल शर्मा याची प्रोफेशनल लाईफही चांगली सुरू नाहीए. त्याचा फिरंगी सिनेमा जोरदार आपटला. त्याच्या नव्या शोला देखील चांगला प्रतिसाद मिळाला नाही. शोची शुटींग दोनवेळा रद्द झाल्यानंतर सोनी चॅनलने कपिलचा शो बंद करण्याची नोटीस पाठवली होती.