मुंबई : रोज एक नवीन चित्रपट किंवा मग सीरिज आपल्याला पाहायला मिळते. काही लोकांना ते कॉन्टेंट आवडतं तर काहींना आवडत नाही. अशीच एक वेब सीरिज सध्या चर्चेत आली आहे. या शॉर्ट फिल्ममुळे गोंधळ उडाला आहे. भगवान जगन्नाथ आणि देवी नारायणी यांना चुकीच्या पद्धतीनं दाखवून शॉर्ट फिल्म निर्मात्यांविरोधात ओडिशातील लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


आणखी वाचा : वैवाहिक आयुष्तान दोनवेळा अपयश तरी..., श्वेता तिवारी लेकीला; म्हणाली 'तू हेच कर...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाजपुर जिल्ह्यातील देबीप्रसाद दास यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला सगळ्यांती माफी मागण्यास सांगितले आहे. कारण ते मियाँ बीवी और बनाना ही सीरिज प्रदर्शित करत आहेत. नीना श्रीवास्तव दिग्दर्शित चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेला 20 मिनिटांचा विनोदी चित्रपट आहे आणि हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन्सवर सामाजिक संदेश देतो.


आणखी वाचा : मोठ्या बजेटचे चित्रपट करुणही मिळाली नाही ओळख..., त्यानंतर अभिनेत्रीला प्रसिद्धीसाठी पाच अभिनेत्यांसोबत करावं लागलं असं काम?


देबीप्रसाद दास यांनी सिटिझन पोर्टलद्वारे जाजपूर रोड पोलिस ठाण्यात 3 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती, ज्यात आरोप केला होता की, चित्रपटातील संवादांमध्ये देवतांना चुकीच्या पद्धतीनं दाखवलं आहे आणि त्यांचा अपमान करण्यात आला आहे.


आणखी वाचा : इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन


तक्रारीनुसार, एका दृश्यात एका मच्छराचं नाव जगन्नाथ आहे आणि त्यासंबंधीत संवाद सुरु असताना अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते, हा संवाद फक्त डासांसाठी होता. देबीप्रसाद म्हणाले, या घटनेत पोलिस कारवाईची वाट पाहत असून गरज पडल्यास चित्रपट निर्मात्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करू. (Complaint filed Against Hindi Short Film Miyan Biwi Aur Banana Over Disrespect To Lord Jagannath know more) 


आणखी वाचा : सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा


चित्रपटाच्या कथालेखकाने जगन्नाथच्या विधवेचं नाव नारायणी असल्याचं सांगितलं. तर या शॉर्ट फिल्ममध्ये असलेले काही डायलॉग्स हे असह्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देबीप्रसाद,म्हणाले 'या सर्वांनी जगभरातील ओडिया समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही.'