मुंबई : हरियाणाची लोकप्रिय गायिका आणि डान्सर सपना चौधरीची लोकप्रियता सर्वाधिक आहे. सपनाच्या गाण्यांची तिचे चाहते मनापासून वाट पाहत असतात. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आता सध्या सपना चर्चेत आहे त्याचं कारण मात्र वेगळंच आहे. सपना चौधरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या सुरूवातीला अभिनेत्रीने आपला बॉयफ्रेंड साहूसोबत साखरपुडा केला होता, अशी अफवा होती. मीडिया रिपोर्टनुसार, सपना गेल्या चार वर्षांपासून हरियाणाचा गायक वीर साहूला डेट करत आहे. पण आता अशी माहिती मिळतेय की गायिका सपना चौधरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 



४ ऑक्टोबरला एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिला आहे.सपना चौधरीने आपलं लग्न आणि प्रेग्नेसी दोन्ही गोष्टी सिक्रेट ठेवल्या. सपनाच्या या खासगी आयुष्यामुळे तिचे चाहते खूप मोठ्या धक्क्यात आहेत. कारण सपनाने कधीच आपल्या लग्नाचा आणि नंतर प्रेग्नेसीचा खुलासा केला नव्हता. सपनाने तिचं खासगी आयुष्य खूप सिक्रेट ठेवलं.


वीरच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे हे लग्न खासगी ठेवण्यात आलंय. पण आता स्वतः वीरने हा आनंद शेअर केला आहे.