बिग बॉस 12 मधून बाहेर पडताच दीपक ठाकूरच्या हाती मोठा प्रोजेक्ट
काय आहे हा नवा प्रोजेक्ट
मुंबई : बिग बॉस सिझन 12 चा ताज दीपिका कक्कडने पटकावला. श्रीसंतला मागे टाकत दीपिका या सिझनची विजेता ठरली आहे. दीपिका आणि श्रीसंतनंतर टॉप 3 मध्ये दीपक ठाकूरचा सहभाग होता.
सलमान खानने विजेता घोषित होण्याअगोदर तिघांना संधी दिली. 20 लाख रुपये घेऊन अंतिम निर्णयातून बाहेर होण्याची संधी दिली. तेव्हा दीपकने 20 लाख रुपये घेऊन ही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला.
दीपकने स्पर्धा संपल्यानंतर मीडियाशी बातचित केली. दीपिका आणि श्रीसंत दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते देखील अधिक असणार.
माझ्या घरची स्थिती तेवढी चांगली नाही. त्यामुळे कोणताच विचार न करता मी बजर दाबला. मी अगदी सुरूवातीलाच हा विचार केला होता की, फायनलला गेल्यावर ऑफर स्विकारायची.
पुढे दीपक म्हणतो की, मी घेतलेल्या निर्णयावर मला कोणताच पश्चाताप नाही. पुढे जी काही संधी मिळेल त्यावर मी खूप मेहनत करेन. मला विश्वास आहे की, माझ्या गाण्यातून आणि माझ्या टॅलेंटमधून मला काही ना काही संधी मिळेलच.
दीपक ठाकूरने अंतिम फेरीत घेतलेल्या निर्णयामुळे सलमान खान देखील खूष होता. त्याने दीपकच्या या निर्णयाचं कौतुक केलं.
पुढच्या वर्षाच्या प्लानबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की, तो खतरों के खिलाडी हा शो करणार आहे. यावरून बिग बॉसनंतर दीपकला मोठा प्रोजेक्ट हाती मिळाला आहे.
खतरों के खिलाडीच्या 10 व्या सिझनमध्ये दिसणार दीपक ठाकूर. दीपकच्या चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे. हा सिझन 5 जानेवारीला सुरू होणार आहे. या शोला दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे.