KBC Updates: बीग बी अमिताभ बच्चन त्यांच्या अनोख्या शैलीनं कौन बनेगा करोडपती या शोची रंगत दिवसेंदिवस वाढवताना दिसत आहेत. त्याचबरोबर रोज येथे येणारे स्पर्धकही आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि हूशारीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत बक्षीस जिंकतायत. पण शेवटी हा शो एक खेळ असून त्यात जिंकणं आणि हरणं हे आलंच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कौन बनेगा करोडपती' ( Kon Banega Crorepati) या क्विझ रिअॅलिटी शोबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नवे स्पर्धक शोमध्ये येतात आणि प्रश्नांची उत्तरे देऊन लाखो आणि करोडो रुपये जिंकतात. त्याचा 14वा सीझन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत परंतु  आतापर्यंत अनेक स्पर्धकांची स्वप्न या शोनं पुर्ण केली आहेत. परंतु इथे एक उत्तर चुकीचं दिलं तर त्याचा परिणाम म्हणजे लाखो रूपये गमावणं. 


सध्या असाच एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं एका स्पर्धकाला महागात पडलं आहे. KBC 14 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने चुकीची उत्तरे देऊन लाखोंचे नुकसान केले. त्यानं दिलेल्या चुकीच्या उत्तरामुळे त्याला चक्क 6 लाख 40 हजार रूपये गमवावे लागले आहेत. 


गुजरातमधील एका कापड कंपनीत काम करणाऱ्या बिग बींच्या समोरच्या हॉट सीटवर सौरभ शेखर हे स्पर्धक बसले होते. हॉट सीटवर बसलेल्या सौरभ यांना बीग बींनी प्रश्न केला की, "पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यापैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?" पर्याय दिले होते, ''पहिला - संयुक्त राष्ट्र, दुसरा - नाटो, तिसरा - इंटरपोल, चौथा - आसियान.'' बरोबर उत्तर होते- ''संयुक्त राष्ट्र'' मात्र, सौरभला यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.


त्यांनी व्हिडीओ कॉल करत फ्रेंड लाईफलाईनची मदत घेतली होती पण त्यांचे उत्तर चुकले आणि ते 3 लाख 20 हजार रुपये घेऊन घरी गेले. 


3 लाख 20 हजार रुपयांसाठी सौरभला विचारण्यात आले की, ''ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे सत्य व्रत शास्त्री हे एकमेव लेखक कोणत्या भाषेत आहेत?'' आणि पर्याय होते, 'पहिला - बंगाली, दुसरा - संस्कृत, तिसरा - हिंदी, चौथा - मैथिली''. या प्रश्नात सौरभ यांनी या प्रश्नाचं 'संस्कृत' असं उत्तर दिलं. जे उत्तर बरोबर होते.