मुंबई : नुकताच डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना बिल गेट्स यांच्या हस्ते 'लाईफटाइम अचिव्हमेंट' (ICMR Lifetime Achievement Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आमटे कुटुंबियांचा सामाजिक सेवेचा वारसा आता त्यांची तिसरी पिढी पुढे नेत आहे. या निमित्ताने भारतीय डिजीटल पार्टी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनिकेत आमटे यांच्याशी केली खास बातचित... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. वकिलाचा मुलगा वकिल होतो त्याप्रमाणे समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होईल असंच नाही. याला कारण म्हणजे समाजसेवकाला मिळणारं मानधन आणि मान-सन्मान. मात्र आमटे कुटुंबियांनी हे विधान साफ खोडून टाकलं आहे. आज बाबा आमटेंची तिसरी पिढी समाजसेवेच्या कार्यात आहे. 


डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना मुलगा अनिकेत आमटे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊनही आज हेमलकसा सारख्या दुर्गम भागात कार्य करत आहेत. भाडीपा आपल्या 'Ready to Lead' या सेगमेंटमध्ये समाजाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींना बोलवून त्याच्या प्रवासाविषयी चर्चा करतात. 



आताच्या सेगमेंटमध्ये अनिकेत आमटे आले असून त्यांनी हेमलकसा, साधना विद्यालय आणि लोक बिरादरी प्रकल्पामध्ये माहिती देत आहेत. अनिकेत आमटेंसारखं तरूण व्यक्तिमत्व देखील बाबा आमटेंनी सुरू केलेला कार्य पुढे नेत आहेत. यामध्ये अनिकेत आमटेंनी तरूणांना सल्ला दिलाय की, प्रत्येक तरूणाने आयुष्यातील एक वर्ष तरी समाजसेवेला द्यायला हवं. ते पुढे म्हणाले की, फक्त आठ दिवस समाजसेवा करण्यापेक्षा एक वर्ष समाजसेवा करा.