मुंबई : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग (Pawan Singh) सध्या त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पवन सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला नाही. पवन सिंगची दुसरी पत्नी ज्योतीनं त्याच्यावर  मानसिक छळ, जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर ज्योतीनं पवनवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही केला आहे. याआधी पवनची पहिली पत्नी नीलमने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणामुळेही त्याच्यावर गंभीर आरोप लावले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : 'कच्चा बदाम' फेम भुवन आता असं आयुष्य जगतोय ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल


पवन सिंहची दुसरी पत्नी ज्योती सिंहनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्योतीनं दावा केला की अभिनेत्यानं तिला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. तसेच तिचा मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यानं केला आहे.


पोलिस तक्रारीत ज्योती सिंहनं आरोप केला की, 2018 मध्ये त्यांच्या लग्नानंतर लगेचच पवची आई आणि बहिणीने तिच्या दिसण्यावर तिची टिंगल केली. पवनच्या आईने ज्योतीच्या कुटुंबीयांकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोपही तिनं केला. याशिवाय, पवनच्या आईने तिच्यासोबत दररोज गैरवर्तन केल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.


ज्योतीनं कोणते आरोप केले? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योतीने पवन सिंहवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पवन अनेकदा दारूच्या नशेत घरी यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. त्यानं तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही ज्योतीनं केला आहे. या शिवाय पवन आणि त्याच्या कुटुंबानं ज्योतीकडे मर्सिडीज कारची मागणी केली. (controversy actor pawan singh first wife self destruction and second wife harassed and akshara singh alleges assault) 


अलीकडेच, उत्तर प्रदेशातील बलिया येथील कौटुंबिक न्यायालयानं नुकतंच पवन सिंग यांना पत्नी ज्योतीनं दाखल केलेल्या घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीत हजर राहण्याचे आदेश दिले. तर, पवन बऱ्याचवेळा न्यायालयात हजर राहू शकला नाही. आता न्यायालयानं पवनला हजर राहण्यासाठी 5 नोव्हेंबर ही शेवटची तारिख दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी पवननं 2014 साली नीलमसोबत सप्तपदी घेतल्या होत्या. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर नीलमनं आत्महत्या केली, ज्यानंतर नीलमच्या कुटुंबातील लोकांनी पवन सिंहवर आरोप केले. नीलमच्या आत्महत्येनंतर पवन भोजपुरी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्री अक्षरा सिंगच्या खूप जवळ आला. दोघांना एकत्र पाहता सगळीकडे त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. तर, अक्षराला पूर्ण आशा होती की पवन तिच्याशी लग्न करेल. पण पवननं अचानक ज्योती सिंहची लग्न केलं. त्यानंतर अक्षरानं पवनवर मारहाणी आणि तिचं करिअर खराब केल्याचा आरोप केला.