MASOOM SAWAL CONTROVERSY:   काही दिवसांपूर्वी एक वेबसीरीज खूप वादात सापडली होती जिचं नाव होत काली (KAALI ) खरतर पोस्टरसमोर येईपर्यंत या वेबसिरीजविषयी कोणाला फारसं माहित नव्हतं मात्र ज्यादिवशी पोस्टर लाँच झालं त्यादिवसापासून या सिनेमावर भरपूर कॉंट्रोव्हर्सी सुरु झाली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर काली मातेला सिगारेट पिताना दाखवण्यात आलं होत.. एवढंच नाही तर एका हातात LGBTQ समुदायाचा झेंडा देखील देण्यात आला होता ज्यावेळी हा पोस्टर समोर आला तेव्हा प्रचंड कॉंट्रोव्हर्सी झाली होती बराच वाद-विवाद झाला होता . 
आता पुन्हा एकदा असाच पोस्टर वाद समोर आलाय  या सिनेमातील पोस्टरवर भगवान श्री कृष्णाचा फोटो अशा पद्धतीनं वापरलाय की संत समाजात आक्रोश पाहायला मिळतोय 


नेमकं काय आहे प्रकरण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ ऑगस्ट म्हणजेच उद्या संतोष उपाध्याय दिग्दर्शित फिल्म 'मासूम सवाल' (Masoom Sawaal) रिलीज होतेय . मात्र रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच हा सिनेमा वादाच्या भोवरयुगात अडकताना दिसतोय. माहितीनुसार या सिनेमाच्या पोस्टरवर भगवान श्री कृष्णाचा फोटो सॅनिटरी नॅपकिनवर छापण्यात आल्याचं दिसत आहे हे पहिल्यांनंतर लोकांच्या नाराज प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बराच वाद सुरु आहे ,या वादनन्तर दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि अभिनेत्री  ऐकवली खन्ना यांनी वक्तव्य केलाय 


अंधश्रद्धेला संपवायचं? 


याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणते ''समाजात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत त्याच संपवण्याचा प्रयत्न मेकर्सचा आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही आहे.. ''
तर दिग्दर्शकाच्या  मते '' प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपण जस पाहू तस आपल्याला दिसत त्यामुळे गैरसमज निर्माण होतात हा सिनेमा मासिक पाळीवर अवलंबून आहे म्हणून सॅनिटरी नॅपकिन दाखवणं गरजेचं आहे '' मात्र श्री कृष्णाचा फोटो छापण्यावर काही वक्तव्य केलेलं नाही.