`हा` मुलगा दुर्बिणीतून पाहायचा मनिशा कोयरालाचं खासगी आयुष्य, समजल्यावर अभिनेत्रीला बसला धक्का
अभिनेत्री मनिषा कोईराला1990 मध्ये चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सौदागर सिनेमातून तिला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : अभिनेत्री मनिषा कोईराला हिने 'संजू' या चित्रपटात साकारलेली अभिनेत्री नर्गिस यांची भूमिका बरीच गाजली, चर्चेचा विषय ठरली. ही भूमिका गाजण्याचं कारणंही तसंच होतं. बराच काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यांनंतर ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्याचा ठाव घेत होती. नेहमी चर्चेत असणारी मनिषा आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री मनिषा कोईराला1990 मध्ये चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सौदागर सिनेमातून तिला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र यानंतर तिचा एक असा सिनेमा आला ज्यामुळे ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये फसली.
या चित्रपटात मनीषा कोईरालासह आदित्य सील, सरोज भार्गव, रणवीर शौरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शशिलाल नायर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. एक छोटी लव्ह स्टोरी पोलिश चित्रपट अबाउट लव्हवर आधारित होता जी एक शॉर्ट फिल्म होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. पण या चित्रपटाने मनीषा कोईरालाची झोप उडाली होती.
फक्त शारीरिक आकर्षण
खरं तर हा चित्रपट एका १५-१६ वर्षांच्या मुलाची कथा आहे जो त्याच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आपल्या मोठ्या स्त्रीकडे आकर्षित होतो. जो दुर्बिणीने तिच्याकडे बघत असतो. बाहेर जाऊन तिला मदत करून तो तिची जवळिकता वाढवतो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्या मुलाची तिच्याबद्दलचं वेड एवढं वाढतं की एक दिवस तो त्याच्या हाताची नस कापतो.
हे आकर्षण मानसिक नसून शारीरिक आहे हे त्या मुलालाही कळतं. चित्रपटाची कथा बोल्ड होती, त्यामुळेच चित्रपटात काही बोल्ड सीन्सही ठेवण्यात आले होते. पण मनीषा कोईराला असे सीन करायला तयार नव्हती. म्हणूनच शशिलाल नायरने चित्रपटात बॉडी डबल वापरून हा सीन शूट केला आहे. जेसिका नावाच्या मॉडेलवर हे सीन चित्रीत करण्यात आले होते.
जेव्हा मनीषा कोईराला हा चित्रपट पाहिला तेव्हा हे प्रकरण चांगलंच तापलं. मनीषाने बोल्ड सीन्सवर आक्षेप घेतला. मनिषाने सांगितलं की, दिग्दर्शकाने तिच्या नकळत चित्रपटात बॉडी डबल वापरली. त्यामुळे मनीषाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली होती. तिने बोल्ड सीन्स हटवण्याची मागणी केली. तर शशिलाल नायर यांनी दावा केला की मनीषा कोईराला यांना चित्रपटातील बोल्ड सीन्सची आधीच माहिती होती.
बॉडी डबलचा वापर तिने असे सीन चित्रित करण्यास नकार दिल्यानंतरच केला गेला, ज्याची तिला जाणीव होती. या चित्रपटावरून न्यायालयात वाद झाला आणि हा सिनेमा नंतर प्रदर्शितही झाला. वादांमुळे चित्रपटाला खूप फायदा झाला. प्रेक्षकांनी हा चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहिला. दीड कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8 कोटींहून अधिक कमाई केली.