मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून गरीब, गरजू आणि अडचणीत आलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावला होता. त्यानंतर तो जगभरात चर्चेत आला होता. त्याला गरिबांचा मसीहा देखील म्हणतात. सोनू सूद अजूनही लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहतो. काही दिवसांपूर्वी सोनू सूद कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत सोनू सूदचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकेच नाही तर सोनू सूद लवकर बरा व्हावा म्हणून त्यांचे चाहते नवरात्रीत उपवास देखील करत आहेत. खरं तर, सोनू सूदच्या एका चाहत्याने त्याला सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत लिहिले की, 'जेव्हा तुम्ही गरीब असलेल्याला मदत करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी देवाचे रूप असता. सोनू सूद जी, तुमची तब्येत ठीक नाही, ऐकल्यानंतर नवरात्रीचे उपवास ठेवले आहे.'




सोनू सूदच्या चाहत्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी अभिनेत्यानेही त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांच्या ट्विटवर सोनू सूदने प्रतिक्रिया देत लिहिले की, 'पप्पू भाई, माझ्यासाठी नव्हे तर देशातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी उपवास ठेवा. माझ्यापेक्षा त्यांना अधिक प्रार्थनांची गरज आहे.' सोनू सूदचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


अभिनेत्याचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया युजर्स देखील त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच सोनू सूदला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली होती.