मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. असं असताना कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सगळ्याच स्तरावरून मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख देखील मदतीसाठी पुढे सरसावला आहे. शाहरूखने यावेळी वेगवेगळ्या स्तरावर कौतुक केलं आहे. शाहरूखने आपलं ऑफिस महानगरपालिकेकरता उपलब्ध करून दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानने आपलं चार मजली कार्यालय कोरोनाशी संबंधित क्वारंटाईन उपकरणांसाठी महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलं आहे. याकरता महानगरपालिकेने ट्विटकरून शाहरूखचे आभार मानले आहेत. 



यासाठी महानगरपालिकेने ट्विट करून शाहरूख आणि गौरीचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील शाहरूख खानचे आभार मानले आहेत. 





आपल्याला माहितच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशातच सर्व सिनेमांच शुटिंग बंद आहे. कलाकार मंडळी देखील आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.