मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी बॉलिवूडही एकत्र आलं आहे. चित्रपट निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शिका जोया अख्तर यांनी एका अनोख्या कॉसर्टचं आयोजन केलं‌ होतं. 'आय फॉर इंडिया' या फंड रेजर कॉन्सर्टसाठी बॉलिवूडच्या अनेक नामांकित स्टार्सने यासाठी आपली कलाकारी सादर केली आहे. या कॉन्सर्टचं लाईव्ह स्ट्रीमिंग नुकतंच फेसबुकवर करण्यात आलं. या कॉन्सर्टमध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन, आमिर खान, वरुण धवन, माधुरी दीक्षित-नेने आणि इतरही अनेक सेलिब्रिटीजनी खास परफॉर्मन्स सादर केले. फेसबुकच्या माध्यमातून 'आय फॉर इंडिया' हा कार्यक्रम रंगला. या कॉन्सर्टचा उद्देश कोरोनाविषयी जागरुकता पसरुन इंडिया फाऊंडेशनसाठी फंड जमा करणं हा आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कॉन्सर्टमध्ये शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन, सैफ अली खान, करीना कपूर, रणवीर सिंह, वरुण धवन, अर्जुन कपूर, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, प्रियंका चौप्रा, अनुष्का शर्मा आणि इतरही काही कलाकार सहभागी झाले होते.







दरम्यान काही दिवसांपूर्वी हॉलिवूड सेलिब्रिटींनीही अशाच प्रकारच्या एका कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या कॉन्सर्टमध्ये लेडी गागासह अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. या कॉन्सर्टद्वारे कोरोना व्हायरस रिलीफसाठी जवळपास 127 मिलियन डॉलर फंड जमा करण्यात आला होता.