मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लोकडाऊन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहे. यामध्ये झी मराठी प्रेक्षकांची साथ देणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. ही वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेनागराज मंजुळे चित्रपट महोत्सव.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेसृष्‍टीत यशस्‍वी दिग्दर्शक म्‍हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते आणि त्यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षक-चाहत्यांसाठी पर्वणीच. येत्या रविवारी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी नागराज मंजुळे यांच्या एकापेक्षा एक अशा कमल चित्रपटांचा नजराणा सादर करणार आहे. 



१९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता बुरसटलेल्या विचारांची तंद्री मोडणारा फँड्री, संध्याकाळी ६ वाजता आई मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा नाळ, आणि रात्री ८.३० वाजता जगाला याड लावणारा सैराट हे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षक घरीच सुरक्षित राहून या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकतात.