मुंबई : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत आता अतिशय महत्वाचा क्षण दाखवला जात आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट दाखवण्यात येत आहे. वडिलांपासून लांब असलेले संभाजी महाराज छत्रपतींच्या भेटीसाठी किती आतुर आहेत हे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण भागात आपण पाहतोय शंभू राजांचा सोबती म्हणजे ज्योताजी. या ज्योताजींबद्दल काही खास गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शंभू महाराजांसोबत अगदी सावलीप्रमाणे असणारा ज्योताजी केसरकर खूप लोकप्रिय होत आहे. महाराजांसाठी आपल्या आजारी वडिलांच्या भेटीसाठी  न जाणारा ज्योताजी सगळ्यांच्याच मनात घर करून आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल ही ज्योताजी केसरकरांचं हे कॅरेक्टर साकारणारी व्यक्ती ही या अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. 



स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत ज्योताजी केसरकरांची भूमिका गणेश लोणारे साकारत आहेत. महत्वाची बाब म्हणजे गणेश लोकारे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत कॉझ्युम डिझाइनर भागात काम करत होते. मालिकेतील पात्रांचे कपडे आणि त्यांचा पेहराव गणेश लोकारे सांभाळत. पण एक दिवस डॉ अमोल कोल्हे यांनी गणेश यांना ज्योताजीची भूमिका साकारण्यास सांगितले. एका नॉन अॅक्टरवर एवढा विश्वास दाखवल्यामुळे गणेश खूप भारावून गेले. आणि आज आपण पाहतो गणेश लोणारे यांनी ज्योताजींची भूमिका किती लोकप्रिय केली आहे.