सोनाक्षी सिन्हा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टाकडून वॉरंट जारी
सोनाक्षी सिन्हाला कोर्टाने पाठवलं वॉरंट, नक्की काय आहे प्रकरण, ज्यामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ...
मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद कोर्टाना सोनाक्षी सिन्हा विरोधान वॉरंट जारी केलं आहे. मुरादामधील इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी एका कार्याक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात सोनाक्षीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं. पण कार्यमात निश्चित वेळी सोनाक्षी पोहोचली नसल्यामुळे शर्मायांनी कोर्टात धाव घेतली. याप्रकरणामुळे सोनाक्षी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
ठरलेल्या तरखेला सोनाक्षी पोहोचली नसल्यामुळे शर्मा यांनी तिच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. पण सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. शर्मा यांनी सोनाक्षीसोबत संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला.
पण पैसे न मिळाल्यास त्यांनी न्यायालयात फसवणुकीची तक्रार केली होती. हे प्रकरण 2018 सालमधील आहे. सोनाक्षी सिन्हा विरोधात मुरादाबादमधील कटघर पोलीस ठाण्यात वॉरंट जारी करण्यात आला आहे.
मुरादाबादच्या न्यायालयाने सोनाक्षीविरोधात वॉरंट जारी केलं आहे. कोर्टात सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाने हे वॉरंट जारी केलं. प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी 24 मार्च 2022 रोजी होणार आहे. दरम्यान नुकताचं सोनाक्षी आणि अभिनेता सलमान खानचा लग्नाचा फोटो तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता फसवणुकीच्या आरोपांमुळे सोनाक्षी चर्चेत आली आहे.