`मला त्या नजरेने...` क्रिकेटरकडून अभिनेत्रीला मिळालेली वर्तवणूक भीतीदायक
जेव्हा तिने क्रिकेट टूर्नामेंटचे अँकरिंग सुरू केले तेव्हा क्रिकेटर्स तिच्याशी कसे वागायचे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि स्पोर्ट्स अँकर मंदिरा बेदीने आता वर्षांनंतर काही गोष्टींचा खुलासा केला आहे. जेव्हा तिने क्रिकेट टूर्नामेंटचे अँकरिंग सुरू केले तेव्हा क्रिकेटर्स तिच्याशी कसे वागायचे.
अभिनेत्रीने सांगितले की क्रिकेटपटू तिला अपमानित करायचे, जेव्हा ती प्रश्न करायची तेव्हा ते तिच्याकडे टक लावून बघायचे आणि ती त्यांना काय प्रश्न विचारते हे पाहायचे.
अभिनेत्रीने असेही सांगितले की क्रिकेटर्सच्या अशा वागण्यामुळे तिला कधीकधी भीती वाटायची, पण त्यावेळी ज्या चॅनेलसाठी ती काम करत होती, त्यांनी अभिनेत्रीला खूप साथ दिली.
2003 आणि 2007 मध्ये मंदिराने ICC क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग सीझन 2 साठी अँकरिंग केले आहे. मंदिरा ही त्या काही महिलांपैकी एक होती ज्यांनी टीव्हीवर क्रिकेट स्पर्धांमध्ये अँकरिंग केली होती.
एका मुलाखतीत मंदिरा म्हणाली, 'मला सांगण्यात आले होते की, त्यावेळी तुमच्या मनात जो प्रश्न येतो तो तुम्ही मोकळेपणाने विचारा, मला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यावेळी बरेच क्रिकेटपटू माझ्याकडे 'ती काय विचारतेय, असं का विचारतेय' असं टक लावून बघायचे.
अखेर त्यांना जे उत्तर द्यायचे होते तेच उत्तर द्यायचे, ज्या उत्तराचा माझ्या प्रश्नाशी काहीही संबंध नव्हता. हे सर्व खूप भीतीदायक वाटेल, पण वाहिनीने मला खात्री दिली.
150-200 महिलांमधून त्यांनी माझी निवड केली. त्या टीमने मला खूप साथ दिली. त्यांनी मला सांगितले की, आम्ही तुला निवडले आहे कारण तुझ्यामध्ये ती गोष्ट आहे की तू टिकू शकते, म्हणून पुढे जा आणि कामाचा आनंद घे...