मुंबई : सोशल मीडियावर झालेली एक मुलाखत मॉडेलसाठी महागात पडली. ही भेट मॉडेलसाठी आता वाईट आठवण म्हणून राहिली आहे. एक व्यक्ती मॉडेलच्या घरी गुपचूप राहत होता आणि मॉडेलचे खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद करत होता. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकन चॅनल WCVBच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील New Hampshire मधील आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉरिसियो डॅमियन-ग्युरेरो नावाच्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पेनसिल्व्हेनियाचा रहिवासी असलेल्या ग्युरेरोची एका वेबसाइटवर मॉडेलसोबत भेट झाली. यानंतर ग्युरेरोने मॉडेलचा पाठलाग सुरू केला.


पाठलाग करत तो एके दिवशी  गुपचूप महिलेच्या घरात घुसला आणि लपून राहू लागला. 643 किमीचे अंतर पार करून ग्युरेरो मॉडेलच्या घरी पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने मॉडेलचे झोपलेले फोटो काढले होते. 


त्याने मॉडेलच्या घरात अनेकदा घुसखोरी केली होती. रात्री मॉडेल झोपली की तो तिचे फोटो आणि व्हिडिओ बनवणे सुरू करायचा. एके दिवशी मॉडेलला संशय आला, म्हणून तिने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 


त्यानंतर ग्युरेरोला मॉडेलच्या घरातून अटक करण्यात आली. एवढंच नाही तर, ग्युरेरोने त्यांचा गुन्हा पोलिसांत कबुली दिली आहे. आता या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.