Cristiano Ronaldo watched Rajnikanth's Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. इतकंच काय तर जपानवरून एक जोडपं चक्क चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईला आलं होतं. रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटीदेखील आहेत. लोकप्रिय पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो देखील त्यांचा चाहता आहे अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. त्याचे कारण म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला असे असल्याचे म्हटले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं दुबईत त्याच्या कुटुंबासोबत रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट पाहिला. याविषयी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका फॅनपेजनं ट्विटरवर माहिती दिली आहे. CR7 Timeline या ट्विटरअकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्याचं कारण ठरलंय ख्रिस्तियानो रोनाल्डोचा त्याच्या कुटुंबासोबतचा चित्रपटगृहाच्या बाहेरचा फोटो. रोनाल्डो हा दुबईत असून त्यानं चित्रपटगृहाच्या बाहेर एक फोटो क्लिक केला आणि हा फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. मात्र, रोनाल्डोनं शेअर केलेल्या फोटोत त्यानं कुठेही असे म्हटले नाही की तो रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट पाहत आहे.



'जेलर' या चित्रपटात रजनीकांत हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही सन पिक्चर्सनं केली आहे. तर चित्रपटाला संगीतबद्ध करण्याचे काम अनिरुद्ध रणवीचंदर यांनी केले आहे. 'जेलर' 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून कलेक्शनमध्ये चित्रपटानं चांगलीच कमाल केली आहे. चित्रपटानं वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर 416 कोटींचा आकडा पार केला आहे. रजनीकांत यांच्या या चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' ला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 'गदर 2' नं वर्ल्ड बॉक्स  ऑफिस कलेक्शनमध्ये 338.5 कोटींचा गल्ला केला आहे. 


हेही वाचा : प्रियांका चोप्रानं स्वतःच लॉन्च केलेल्या रेस्त्रॉशी तोडलं नातं; पण का? येथे वाचा


'जेलर' विषयी आणखी बोलायचे झाले तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या कमल हासन यांच्या 'विक्रम' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे. त्या चित्रपटानं वर्ल्ड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 410 कोटींचा गल्ला केला होता. थोडक्यात 'जेलर' नं 'विक्रम' चा रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान, अजून चित्रपटाच्या टीमकडून बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी अधिकृत माहिती आलेली नाही.