मुंबई : कर्नाटक शाळा आणि कॉलेजमध्ये सुरू असलेला 'हिजाब वाद' काही शमण्याच नाव घेत नाही. देशात सुरू असलेल्या हिजाबच्या वादात राजनेता आणि फिल्मी कलाकार सगळेच सहभागी झाले आहेत. आता 'दंगल गर्ल ' नावाने लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीमने या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची जोरदार चर्चा रंगतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जायरा वसीमने पूर्णपणे सिनेमाला अलविदा केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हिजाबवर पोस्ट लिहिली आहे. 


या पोस्टमध्ये तिने कर्नाटक शाळा, कॉलेजमधील हिजाब प्रकरणाला विरोध केलाय. परंपरेने हिजाब मिळाला ही एक निवड आहे, असं म्हणणं असेल तर ते चुकीचे आहे. ही एक प्रकारची धारणा आहे. ज्याला सोईनुसार बनवलं आहे. 


दंगल गर्ल पुढे पोस्टमध्ये म्हणते की, इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक जबाबदारी आहे. हिजाब परिधान करणारी एक स्त्री एक कर्तव्य पूर्ण करत आहे. जे तिला देवाने दिलेली आहे.


ज्यावर ती प्रेम करते आणि तिने स्वतःहून ते स्वीकारले आहे. मी देखील हिजाब सन्मानाने आणि आदराने परिधान करते. 



या व्यवस्थेला धर्माच्या नावाखाली महिलांना हे करण्यापासून रोखले जाते, त्या व्यवस्थेला माझा विरोध आहे. मुस्लिम महिलांविरोधात पक्षपात करणे. 


त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडावा लागेल किंवा ती सोडून द्यावी लागेल अशी व्यवस्था स्थापन करणे हे अन्यायाने भरलेले आहे.