मुंबई : बॉलिवूडच्या दंगल गर्ल्स फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत. या दोघी अभिनेत्रींची मैत्रीही काही खास आहे. अनेकदा त्यांचे धमाल मस्तीचे व्हिडिओज समोर येत असतात. आता पुन्हा एकदा या दोघींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो फॅन्सचा नक्कीच भावेल.


दंगल गर्ल्सचा जलवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेली डान्सर नोरा फतेहीचे दिलबर गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रसिकांबरोबरच हे गाणे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनाही खूप भावले. त्यात फातिमा आणि सान्या यांचाही समावेश आहे. त्यामुळे या गाण्यावर दोघीही थिरकल्या. हा डान्स व्हिडिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. काही वेळात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा हा डान्स पाहुन तुम्ही नक्कीच त्यांचे फॅन्स व्हाल. पहा त्यांच्या हा खास डान्स व्हिडिओ...



या सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


फातिमा शेख सध्या आगामी सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ यांसारखे कलाकार आहेत. तर सान्या मल्होत्रा 'पटाखा', 'दो बहनें' आणि 'बधाई हो' या सिनेमांमुळे चर्चेत आहे.