मुंबई : अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने जगात आपला दबदबा कायम ठेवलाय. 'दंगल' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झालेय. 'दंगल'ची विक्रमी कमाई झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दंगल' या सिनेमाला देशात नाही तर संपूर्ण जगभरात चांगले यश मिळत आहे. चीनमध्ये 'दंगल'ची जोरदार कमाई सुरुच आहे. चीनमध्ये आता 'दंगल'ने १६९ मिलियन डॉलर्सवर कमाई केली आहे. या रेकॉर्डब्रेक कमाईसोबत दंगलने हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे.


'दंगल' या सिनेमाने ३१ व्या दिवशी ३.५३ मिलियन डॉलरच्या कलेक्शनसह १६९.१६ मिलियन डॉलर म्हणजेच १०८८ कोटींचा टप्पा गाठला आहे. दंगलची जगभरातील कमाई आता १८७० कोटी रुपये झाली आहे.


परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत 'दंगल' या सिनेमाला अव्वल स्थान मिळाले आहे. 'दंगल'ने गेल्यावर्षी सर्वाधिक गल्ला जमवला. दंगलने तैवानी मार्केटमध्येही ३६.५० कोटींची कमाई केली आहे. ज्यानंतर भारताबाहेरील या चित्रपटाचा व्यवसाय १३२७.५० कोटींचा झाला आहे.