मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक कालाकारांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma). अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'डार्लिंग्स' (Darlings) सिनेमानंतर विजय वर्माच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमात त्याने हम्जा भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांची मने जिंकली. डार्लिंग्जमध्ये ग्रे शेड असलेली व्यक्तिरेखा साकारल्यामुळे विजयचे कौतुक झाले. दिवसागणिक वाढत असलेल्या लोकप्रियतेमुळे विजयला लग्नासाठी अनेक मुली मागणी घालू लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या वियज ‘मिर्झापूर 3’ (Mirzapur 3)च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच लखनऊला आला होता. यादरम्यान त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने काही फोटो शेअर करत त्याला येत असलेल्या लग्नाच्या मागण्यांबद्दल सांगितले. (Vijay Varma Marriage Proposals From Pakistan)


व्हिडीओतून अभिनेत्याने आलेल्या लग्नाच्या मागण्यांचे फोटो शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये विजयसोबत लग्न करण्यासाठी तयार असलेल्या मुली इतर देशांमधील आहे.



एका तरुणीने लिहिले, “कृपया पाकिस्तानात या आणि माझ्या आई-वडिलांसोबच लग्नाची बोलणी करा.” यावर प्रतिक्रिया देताना विजयने लिहिले की, “लखनऊचे शूटिंग संपताच मी पाकिस्तानात येण्याचा प्लॅन बनवतो. मिर्झापूरचे शूटिंग काय सुरूच राहिल.” (Marriage Proposals to Vijay Varma)


सध्या अभिनेत्याची लोकप्रियता पाहता येत्या काळात विजयला  अनेक सिनेमांची ऑफर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या विजय वर्माने ' एमसीए' तेलुगू  सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.  (Darling fame Vijay Varma)