मुंबई : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण यापेक्षाही ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी मात्र एका वेगळ्या कारमामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने आपलं लव्ह लाईफ आणि अफेअर्स नेहमीच गुपित ठेवले आहेत. नुकताच ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, इतर स्टार्सप्रमाणे ती ब्रेकअपनंतर तिच्या एक्ससोबत कोणतीही  मैत्री ठेवत नाही. ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे.


असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. समोर आलेल्या व्हिडिओत ऐश्वर्याने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विवेकला दुर्लक्षित करताना दिसतेय.  यावेळी ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन  एका कार्यक्रमात बसल्याचा दिसत आहे. यावेळी विवेकची एट्री होते मात्र ऐश्वर्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडला इग्नोर करते. यावेळी अमिताभ बच्चनही खूपच अस्वस्थ दिसत होते.


माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ एका अवॉर्ड फंक्शनचा आहे. जिथे विवेक ओबेरॉय स्टेजवर बोलताना दिसतोय. त्यांना पाहून ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा चेहरा पडला. सुरुवातीला दोघांना काही समजलं नाही, नंतर काही वेळाने ऐश्वर्या तिच्या शेजारी बसलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत बोलू लागली. यादरम्यान अमिताभ बच्चनही थोडे नाराज दिसले. दुसरीकडे, विवेक ओबेरॉय स्टेजवर आपलं  स्पिच पूर्ण करताना दिसला. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आत्ताचा नसून जूना आहे. मात्र पुन्हा एकदा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एबीपी न्यूजने युट्बूवर शेअर केला आहे.


एकेकाळी विवेक आणि ऐश्वर्या दोघं रिलेशनशिपमध्ये होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल बोललो तर, सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर दोघंही खूप जवळ आले होते. पण या दोघांचं नातं अनेकदा वादात आलं होतं.  सुत्रांच्या माहितीनुसार सलमान खानने विवेक ओबेरॉयला धमकी दिली होती. यामुळे ऐश्वर्या विवेक ओबेरॉयपासून दुरावला आणि त्यांचं नातं संपुष्टात आलं. त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली