डेंग्यूमुळं प्लेटलेट्स कमी झाल्यात? काय खावं व काय टाळावं? वाचा

डेंग्यू हा तापाचा एक प्रकार आहे. एका विशिष्ट प्रजातीचे डास चावल्यामुळं डेंग्यूचा ताप येऊ शकतो. अशावेळी काय काळजी घ्यायची व आहार कसा आसावा, याची माहिती घेऊया. 

Jul 02, 2024, 12:29 PM IST

डेंग्यू हा तापाचा एक प्रकार आहे. एका विशिष्ट प्रजातीचे डास चावल्यामुळं डेंग्यूचा ताप येऊ शकतो. अशावेळी काय काळजी घ्यायची व आहार कसा आसावा, याची माहिती घेऊया. 

1/11

पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. या काळात रुग्णांनी काही गोष्टींची किंवा खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेतली पाहिजे. असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होऊ शकते.

2/11

पपईचे पान

  पपईच्या अर्कामध्ये पपईन आणि किमोपापेन सारख्या एन्झाईम्स असल्यामुळे पचनास मदत होते. ताज्या पपईच्या पानांचा रस प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होते.  

3/11

डाळिंब

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. ज्यामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते . रक्तातील प्लेटलेटची  संख्या राखण्यास मदत करते जे डेंग्यूसाठी आवश्यक आहे.

4/11

लसूण

हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न आहे. ताप किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. लसणात असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील खराब जंतू आणि विष काढून टाकतात.  

5/11

दही

दही केवळ  पचनासाठी मदत करत नाही तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगले कार्य करण्यास मदत करते. हे प्रोबायोटिक म्हणून कार्य करते जे आवश्यक आतड्यांतील बॅक्टेरियाच्या उत्पादनास उत्तेजन देते.

6/11

ग्रेपफ्रूट

 ग्रेपफ्रूट हे पोषक तत्वांनी समृद्ध फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. हे फळ ताप कमी करणारे म्हणूनही काम करते आणि शरीरात संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देते.

7/11

नारळ पाणी

 डेंग्यूमुळे सामान्यतः डिहायड्रेशन होते. अशा परिस्थितीत नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. नारळपाणी पाण्याची कमतरता भरून काढते.

8/11

किवी

 यामध्ये पोटॅशियमसह व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. याचा उपयोग लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. 

9/11

मसालेदार अन्न

 डेंग्यूची लागण झाल्यास मसालेदार अन्न टाळा कारण या अन्नामुळे पोटात आम्ल जमा होऊ शकते. असे अन्न खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या होऊ शकतात. 

10/11

कॉफी

 तापात शरीरात डिहायड्रेशन होते त्यामुळं हायड्रेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहेच. परंतु कॉफी, चहा यासारख्या कॅफिन असलेल्या गोष्टी टाळा.

11/11

तळलेले अन्न

 तेलकट अन्नामध्ये खूप फॅट असतात ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल होऊ शकते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)