मुंबई : ‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर म्हणजेच दयानंद शेट्टी, जो दरवाजे तोडण्याच्या खास स्टंटसाठी लोकप्रिय आहे. या मालिकेत जेव्हाही एसीपी प्रद्युमनला गुन्हेगाराला शोधण्यासाठी कुठे जायचं असतं, तिथे दरवाजा तोडण्यासाठी दया हा त्यांची पहिली पसंत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भलेही त्यांना मोठे आणि चांगले रोल ऑफर होत नसले तरी, या कलाकाराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 


दया म्हणजेच दयानंद शेट्टी हा अभिनेता गेल्या दोन दशकांपासून ‘सीआयडी’मध्ये काम करतो आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तो लोकप्रिय आहे. मात्र, त्याच्यावर सीआयडीचा शिक्का बसलाय. त्याची ओळख त्यापेक्षा अधिक आहे. पण त्याकडे फारसं कुणी लक्षच देत नाही. दयानंद हा अ‍ॅक्टींगमध्ये येण्याआधी एक स्पोर्टमन होता हे बहुतेकांना माहितीच नाही. दयानंदला पायात झालेल्या जखमेमुळे खेळ सोडावा लागला. दयानंद हा शॉट पुट आणि डिस्कस थ्रोअर होता. या खेळात त्याने अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत.


१९९४ मध्ये तो महाराष्ट्रातून डिस्कस थ्रो या खेळाचा चॅम्पियन बनला. त्यानंतर त्याने सीआयडी या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि त्यात निवडला गेला. या शोच्या माध्यमातून केवळ दया नाही तर इतरही कलाकारांना वेगळ्या उंचीवर जाण्याची संधी मिळाली. इतक्या वर्षांपासून दया ही मालिका करतो आहे. त्यामुळे सहाजिकच त्याच्या चाहत्याना दया किंवा या मालिकेतील कलाकार किती पैसे कमवतात याची उत्सुकता लागलेली असते.


इतरांची माहिती अजून मिळाली नाही पण दया या मालिकेसाठी किती पैसे घेतो याची माहिती इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. या माहितीनुसार दयानंद शेट्टी हा या मालिकेसाठी दिवसाला १ लाख रूपयाचं मानधन घेतो. म्हणजे दया जर महिनाभर काम करत असेल तर तो महिन्याला ३० लाख रूपये या मालिकेतून कमावत असेल. त्याची ही कमाई केवळ सीआयडी मालिकेची आहे. इतर कामांमधून तो वेगळी कमाई करतो. दया आताने ‘सिंघम रिटर्न्स’, ‘जॉनी गद्दार’ आणि ‘रनवे’ सारख्या सिनेमातही काम केलं आहे.