मृत्यूनंतर ७२ तासांनी श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत दाखल
अभिनेत्री श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या निधनानंतर 72 तासाने भारतामध्ये पोहचले आहे.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या निधनानंतर 72 तासाने भारतामध्ये पोहचले आहे.
शनिवारी रात्री टबबाथमध्ये बुडून श्रीदेवींचे निधन झाले होते. त्यानंतर दुबईत विविध चौकशी आणि कायदेशीर सोपास्कार पार पाडल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिव प्रायव्हेट जेटने मुंबईत पोहचले आहे.
कुठे ठेवणार पार्थिव शरीर ?
आज (मंगळवार) सुमारे 9.33 च्या दरम्यान विमान मुंबई विमानतळावर उतरले आहे. पार्थिव विमानतळातून गेट क्रमांक 8 वर आणाणार अशी माहिती होती. तसेच अभिनेता अनिल कपूरही काही काळ या गेटवर दिसला. परंतू श्रीदेवी यांचे पार्थिव गेट क्रमांक 1 वरून अॅम्बुलन्स ठेवण्यात आले.त्यानंतर कपूर कुटुंबीय ग्रीन एकर्सकडे रवाना झाले आहेत.
श्रीदेवींचे पार्थिव शरीर बुधवारी सकाळी 9.30 ते 1 दरम्यान अंधेरीतील त्याच्या घराजवळ सेलीब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेथेच चाहते श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेणार आहेत.
सुमारे 3.30 वाजेपर्यंत पार्लेमधील एस.वी रोडजवळील विले पार्ले वेस्ट सेवा समाज स्मशान घाट येथे अंतिम संस्कार होतील.