Game Changer Pre-Release Event: काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2'  चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात घडलेल्या दुर्घटनामुळं देशभरात पुष्पा चित्रपट चर्चेत होता. अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. मात्र अचानक उसळलेल्या या गर्दीमुळं एकाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे अल्लू अर्जुन विरोधात तक्रार देखील दाखल केली गेली होती. या घटनेसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता रामचरणचा गेमचेंजर चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र त्याआधीच गेमचेंजरच्या प्री-इव्हेंटमधून परतत असताना दोघा चाहत्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. चाहत्यांच्या मृत्यूनंतर रामचरण याने हळहळ व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इवेंटदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. शनिवारी चित्रपटाच्या प्रदर्शन पार पडले. 23 वर्ष वय असलेले मनीकांता आणि 22 वर्षीय थोकडा चरण यांचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला तब्बल दहा लाखांची मदत करणार असल्याची घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली. राम चरण आणि 'गेम चेंजर' चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत करणार अशी घोषणा केली.


हे ही वाचा: मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...


 


नेमकं घडलं काय?


रिपोर्टनुसार,  दोन्ही चाहते चित्रपट पाहिल्यानंतर शनिवारी रात्री बाइक वरुन घरी परतत होते. यादरम्यान अचानक समोरुन आलेल्या व्हॅनने बाइकवरील दोघांना टक्कर दिली. या दुर्घटनेत त्या दोघांना आपला जीव गमवावा लागला. या धक्कादायक दुर्घटनेनंतर दोघांना पेड्डापुरममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार रंगमपेटा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली गेली. 


चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख


'गेम चेंजर' चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी गंभीर दुर्घटनेत मृत पावलेल्या या चाहत्यांसाठी दु:ख व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन भावूक पोस्टसुद्धा केली. निर्मात्यांच्या प्रोडक्शन हाऊस श्री व्यंकटेश्वरा क्रिएशनतर्फे ही पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये निर्माते दिल राजू यांनी मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत करण्याची घोषणा केली, असे नमूद केले आहे.