सारा अली खान तिच्या अध्यात्मिकतेमुळे नेहमीचं चर्चेत असते. नेहमीचं तिचे मंदिरातील फोटोजही व्हायरल होत असतात. ती भोलेनाथांची खूप मोठी भक्त आहे हे सर्वांनाचं माहित आहे. नववर्षाच्या पहिल्या सोमवारी या अभिनेत्रीने महाशंकर यांच्या मंदिरात पोहोचून नमन केले. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले तर इतर नेटकऱ्यांनी ट्रोल केले. पण ट्रोल करण्यामगचे कारण नेमकं काय? जाणून घेऊयात.
सारा अली खानचा भोलेनाथप्रती भक्तिभाव
सारा अली खान आपल्या धार्मिक आणि अध्यात्मिक आवडीसाठी ओळखली जाते. ती नियमितपणे महादेवांच्या मंदिरांना भेट देत असते आणि तिच्या या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यापूर्वी तिने केदारनाथ, उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली होती. अमरनाथ गुहेचा व्हिडीओ शेअर करत सार्वांना तीव्र भक्तीचे दर्शन घडवले आहे.
नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम दर्शन
श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. दर्शनासाठी सारा पारंपरिक पांढऱ्या चिकनकारी वर्क असलेल्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्या कपाळावर चंदन आणि डोक्यावर स्कार्फ होता, ज्यामुळे तिच्या भक्तिभावाला एक शांत आणि दैवी स्पर्श मिळाला होता.
फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष
सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ती देवासमोर नतमस्तक होताना, हात जोडून प्रार्थना करताना आणि मंद स्मितहास्याने कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्तीची आणि शांतीची झलक अनेकांच्या मनाला भिडली. परंतु काही नेटकऱ्यांनी तिच्या या कृतीवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'म्हणूनच तू फ्लॉप होत आहे.' दुसऱ्या नेटकऱ्याने तिला स्वतःचे नाव बदलण्याचा सल्ला दिला, तर तिसऱ्याने तिच्या धर्माबद्दल विचारले की, ती कोणत्या धर्माची आहे? सारा अली खान मुस्लिम धर्माची आहे, परंतु ती हिंदू धर्मातील मंदिरांमध्येही जाते, ज्यामुळे काही लोक तिच्यावर टीका करतात.
या ट्रोलिंगविषयी सारा अली खानने पूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. तिने स्पष्ट केले की, मंदिरात जाणे ही तिची वैयक्तिक निवड आहे आणि ती कोणत्याही ट्रोलिंगमुळे प्रभावित होत नाही. तिच्या मते, तिचे काम तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्या कामाचे चाहते तिचे कौतुकही करतात. साराची धार्मिकता आणि विविध धर्मांप्रती आदर दर्शविणारी कृती तिच्या चाहत्यांमध्ये प्रशंसा आणि आदर निर्माण करते, परंतु काही लोक तिच्यावर टीका करण्यासही मागे हटत नाहीत. तरीही, सारा तिच्या श्रद्धेप्रती प्रामाणिक राहून तिच्या मार्गाने पुढे जात आहे.
हे ही वाचा: अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी
वर्क फ्रंट
सारा अली खान शेवटची 'मर्डर मुबारक' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय विकी कौशलसोबतच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ती आता अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स' या चित्रपटात दिसणार आहे, जो 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सारा अली खान फक्त एक अभिनेत्री नाही, तर भक्ती आणि अध्यात्मिक प्रवासाची प्रेमिका आहे. तिचा भोलेनाथावरील विश्वास आणि ती साजरी करणारी साधी, पारंपरिक जीवनशैली तिला तिच्या चाहत्यांच्या आणखी जवळ नेते.