Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी  'इमर्जन्सी' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. 3 वेळा या चित्रपटाचे प्रदर्शन देखील पुढे ढकलण्यात आले होते. आता या चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, अजूनही कंगना रणौतच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कारण आता अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्रीने थेट पोलिसांकडे याबाब तक्रार दाखल केली आहे.  धमकीनंतर अभिनेत्रीने पोलिसांकडे मदत मागितली आहे. 6 सप्टेंबरला तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तिने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये काय?


अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बोलत आहे की, जर कंगना रणौतचा हा चित्रपट रिलीज झाला तर सरदार तुला चप्पल मारतील. कानशिलात तर तू आधीच खाल्ली आहे. मी एक भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे. त्यामुळे जर मी तुला महाराष्ट्रात कुठेही पाहिले तर मी माझे सर्व हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव यांच्यावतीने तुला चप्पल घालून तुझे स्वागत करू. जर आम्ही मुंडके छाटून घेऊ शकतो तर मुंडके छाटूही शकतो. अशी धमकी देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडीओ



'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी


कंगना रणौतच्या 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. कंगनाच्या या चित्रपटात शीख समुदायाला चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने म्हटले की, भिंद्रनवाले याला समुदायाचा शहीद म्हणून घोषित केलं असून संपूर्ण शीख समुदायाची फुटीरतावादी म्हणून प्रतिमा निर्माण करणे खूप चुकीचे आहे.