Debina Bonnerjee : दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर देबिनाची बिघडली प्रकृती
देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.
Debina Bonnerjee Latest Pic : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कपूर (Alia Bhatt Kapoor), अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी या तिघींच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. या तिघींचीही सोन परी दिसतात कशा अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. देबिना दुसऱ्यांदा मुलीची आई झाली आहे. 11 नोव्हेंबरला 2022 रोजी तिला मुलगी झाली.
देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. या कपलच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीने मुलीचा फोटो शेअर केला नसला तरी तिच्या तब्येतीची माहिती तिने नक्कीच दिली आहे. आपल्या नवीन पोस्टमध्ये, तिने मुलीला जन्म देणं किती कठीण होतं हे देखील सांगितलंय. एवढंच नाही तर अभिनेत्रीने तिच्या सुजलेल्या पायांचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शेअर केला फोटो
देबिना बॅनर्जीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या पायाला आलेली सूज स्पष्टपणे दिसत आहे. 'हळूहळू मी पूर्वीपेक्षा चांगली होत आहे. जे तुम्हाला मजबूत बनवतात हे खरं आहे. गेले काही दिवस आणि महिने खूप कठीण गेले. मी सगळ्याचा सामना केला. माझे हात पाय अजूनही सुजले आहेत. पण मी पॉझिटीव्ह आहे'.
लग्नाच्या 11 वर्षानंतर झाली आई
देबिना आणि गुरमीत चौधरी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देबिनाला तिच्या गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. लग्नाच्या सुमारे 11 वर्षानंतर देबिनाने यावर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. 7 महिन्यांनंतर देबिना आणि गुरमीत यांना दुसरी मुलगी झाली. या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. अभिनेत्याने सांगितलं की आमची मुलगी वेळेपूर्वीच या जगात आली आहे. तुमची प्रार्थना तुमचे आशीर्वाद कायम सोबत असू द्या.