Priyanka Chopra नंतर `या` सेलिब्रिटी कपलनं दाखवला मुलीचा चेहरा
या लोकप्रिय कपलनं नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary shared Daughter Photos : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौथरी (Gurmeet Choudhary) हे नुकतेच आईवडील झाले आहेत. गेल्या वर्षी हे दोनवेळा देबिनानं तिच्या मुलांना जन्म दिला आहे. सगळ्यात आधी 3 एप्रिल रोजी आणि 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. देबिना पहिल्या मुलीची आई आईवीएफच्या माध्यमातून झाली होती. आता देबिना आणि गुरमीतनं त्यांची मुलगी दिविशाचे काही फओटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. देबिनाच्या मुलीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary Daughter Photos)
देबिना बॅनर्जीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे आणि तिच्या मुलीचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देबिना गुरमितनं निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर तिच्या दोन्ही मुलींनी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करत 'ही आमची जादुई मुलगी दिविशा आहे... गुड वाईब्स आणि आशीर्वाद नेहमी.' पहिल्या फोटोमध्ये देबिना आणि गुरमीतनं दिविशाला पकडल्याचे दिसत आहे. तर दिविशानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
देबिनानं शेअर केलेल्या या दुसऱ्या फोटोमध्ये देबिनानं सिंड्रेला ड्रेस परिधान केला आहे. तर गुरमीतनं त्यांची मोठी मुलगी लियानाला धरलं आहे. देबिना, गुरमीत आणि त्यांच्या मुलींचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत क्यूट असं म्हणाला. तर दुसरा नेटकरी दोघी मुली या गुरमीत सारख्या दिसतात.
2008 मध्ये रामायण मालिकेतून गुरमीत आणि देबिना घराघरात पोहोचले. देबिनाने सीतेची तर गुरमीतने रामाची भूमिका साकारली होती. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर गुरमीत आणि देबिनाच्या घरात लहान पाहुनीचे आगमन झाले होते.
हेही वाचा : LIC एजंट होता Abhishek Bachchan, बिग बींच्या कर्जामुळे सोडलं शिक्षण
जेव्हा देबिना दुसऱ्यांदा गरोदर होती, तेव्हा गुरमीतने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला सलग दोन मुले हवी आहेत. त्याचा मोठा भाऊ आणि तो सुद्धा असेच मागे मागे होते. देवाने देबिनाला पुन्हा आई होण्याचा आशीर्वाद आणि हक्क दिला ही भाग्याची गोष्ट आहे.