Deepak Dobriyak Struggle Story: बॉलिवूड हे असं विश्व आहे जिथे नेपोटिझम (Bollywood News) आणि बाहेरून येणारे कलाकार म्हणजेच आऊटसाईडर्स यांच्यामध्ये अनेकदा ओढातोण दिसून येते. बाहेरून येणारे कलाकार यांना मोठ्या प्रमाणात स्ट्रगल (Deepak Dobriyal Latest Interview) करावा लागतो तर याच इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या मुलांना फारसा स्ट्रगल करावा हा लागत नाही आणि त्यातून यांना मोठे प्रोजेक्ट्स अगदी सहज मिळतात आणि ही माणसं इंडस्ट्रीत टोळक्यांनी फिरतात आणि बाहेरून आलेल्यांचा पाय ओढायचा प्रयत्न करतात तसेच त्यांना संधी देत नाहीत अशी खोचक टीकाही तिच्यावर होत असते. परंतु असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या सगळ्या संकटांना झुगारून आपल्या हिमतीवर आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि त्यातील एक नाव म्हणजे दिपक डोबरियाल. अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भोला' (Deepak Dobriyal in Bhoola) या चित्रपटात दिपकनं खलनायकाची भुमिका केली आहे. ज्याच्या अभिनयाचे सगळीकडेच कौतुक होताना दिसते आहे. त्यातून हा अभिनेताही फार मोठा संघर्ष करून आज आपल्या पायावर या इंडस्ट्रीमध्ये उभा आहे. दिपक हा कुठल्या बॉलिवूडच्या खानदान परिवारातून येत नाही किंवा त्याचे कोणी नातेवाईकही या क्षेत्रात नव्हते परंतु त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर आणि आपल्या हिमतीवर आपले स्थान निर्माण ेकेले आहे. परंतु त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास हा काही सोप्पा नव्हता. (deepak dobriyal shares his struggle story recent interview entertainment news marathi)


आगळावेगळा अभिनेता


दिपक डोबरियाल हा दिल्लीवरून मुंबईला अभिनेता होण्यासाठी आला. त्यानं सुरूवातीला 'ओमकारा'सारख्या चित्रपटांमध्ये कामं केली. 2020 मध्ये इरफान खान समवेत आलेल्या 'इंग्रजी मिडियम' या चित्रपटातून केलेली त्याची भुमिका ही लक्षवेधी ठरली. तेव्हा त्याच्या या अभिनयाचे प्रचंड कौतूक करण्यात आले होते. त्यानं 'बाबा' नावाच्या मराठी चित्रपटातूनही उत्तम भुमिका केली आहे. त्याच्या या भुमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या निर्मितीखाली होता. आता 'भोला' या चित्रपटात तो अश्वथामाच्या भुमिकेतून दिसला आहे. 


असा होता स्ट्रगल 


नुकत्याच त्यानं आज तकला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या काही अनुभवांविषयी शेअर केले आहे. दिपकनं सांगितले की, जेव्हा तो दिल्लीवरून मुंबईला आला तेव्हा त्याच्याकडील सर्वच पैसे संपले होते तेव्हा आपल्या मित्रांकडे त्यानं पैसे मागितले जेव्हा जाऊन त्याला 6-7 हजार रूपये मिळाले. एवढ्या पैशांमुळे त्यांनी कॅलेंडरवर 90 दिवसांची डेट फिक्स केली होती. पण तेवढ्यातच त्यांना एका मोठ्या जाहिरातीची ऑफर आली आणि चक्क त्यांना त्यातून त्यांना 1 लाख रूपये मिळाले आणि त्यांचे नशीबचं बदलले.