मुंबई : 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील मलखान म्हणजेच दिपेश भानचं शनिवारी सकाळी निधन झाले. दीपेशच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाचा आहे. शनिवारीच दिपेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सेलिब्रिटीचं नाही तर चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं दीपेशच्या निधनानंतर शोकसभेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी 'भाबी जी घर पर हैं' मालिकेतील सर्व कलाकार शोक सभेत पोहोचले. मालिकेतील अंगूरी भाभी या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने एक दिवस आधी अभिनेत्यासोबत शूट केलं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यामुळे दीपेशच्या शोक सभेत शुभांगीचे अश्रू अनावर झाले. सध्या अंगूरी भाभीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुभांगी व्यतिरिक्त  रोहितश्व गौर, वैभव माथूर, किकू शारदा, विदिशा श्रीवास्तव आणि निर्मल सोनी यांच्यासह इतर टीव्ही कलाकार शोक सभेला उपस्थित होते.


'भाबीजी घर पर हैं' मालिके पूर्वी, दीपेशनं 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर' सोबत 'चॅम्प' आणि 'सुन यार चिल मार' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये दिपेशनं 'फालतू उटपटांग चटपटी कहानी' या चित्रपटातही काम केलं होतं. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता.