Rashmika Mandanna `डीपफेक` प्रकरणातील आरोपीची कबुली; म्हणाला,`इन्स्टा पेजचे...`
गेल्या काही दिवसांपुर्वीपासून रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी डीपनेक स्पॅगेटी घालून लिफ्टमध्ये चढताना दिसली होती. गेले अनेक दिवस दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते.
Rashmika Mandanna deepfake case : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डिपफेक व्हिडीओची चर्चा आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये हुबेहूब रश्मिकासारखी दिसणारी एक मुलगी डीपनेक स्पेगिटी परिधान करुन लिफ्टमधूबाहेर पडताना दिसली होती. हा व्हिीडीओ पाहून अभिनेत्रीच्या चाहते चांगलेच भडकले होते.
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिस स्पेशल सेलने मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबरला एफआईआर नोंदवला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पहिलेदेखील बरेच सायबरसंबधीत प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. याच आरोपीने रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ बनवाला आहे. त्याने एका वृद्ध महिलेलाही डिजिटल पद्धतीचा वापर करुन फसवलं आहे.
रश्मिकाचा हा व्हिडीओ ६ नोव्हेंबरला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना लिफ्टमध्ये दिसत आहे. याबाबत रश्मिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना पकडलं होते. मात्र आता प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रश्मिकाने व्यक्त केलं होतं दु:ख
अभिनेत्री रश्मिकाने ६ नोव्हेंबरला एक पोस्ट शेअर करत लिहीलं होतं की, माझा डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याबद्द्ल मला बोलायला खंत वाटतेय. ईमानदारीने सांगायचं झालं तर, एआई फक्त माझ्यासाठीच नाही तर आमच्यापैकी प्रत्येकसाठी खूप भयानक आहे. जो या टेक्नोलॉजीचा मिस यूजच्या कारणाने धोक्यात आहे.
खऱ्या व्हिडीओत होती जारा पटेस
गेल्या काही दिवसांपासून रश्मिकाचा एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत हुबेहूब दिसणारी मुलगी लिफ्टमध्ये डिपफेक स्पेगेटी परिधान करुन दिसली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना राग अनावर झाला होता. मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचं काही वेळातच समजलं होतं. समोर आलेल्या व्हिडीओतली मुलगी कोणी वेगळीच होती. काही वेळाने हे स्पष्ट झालं की, व्हिडीओत दिसणारी मुलगी रश्मिका नसून जारा पटेल आहे. जी एक ब्रिटिश इंडियन इंफ्लुएंसर आहे. रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 'एनिमल'मध्ये दिसली होती.